लोकनेता न्युज नेटवर्क
मुखेड (प्रतिनिधी) :- नांदेड जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल वाजले असून मुखेड तालुक्यातील सकनुर पंचायत समिती गणातून निवडणुकीची तयारी पण सुरू झाली असून या गणातून पांडुरंग भिकणे सकनुरकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण व मुखेड कंधार विधानसभेचे मा आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेबांनी आदेश दिल्यास आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सकनूरकर यांनी स्पष्ट केले
सध्या विद्यार्थी काँग्रेस नांदेड जिल्हासरचिटणीस या पदावर कार्यरत असलेले सकनूरकर हे कनिष्ठ स्तरावरून पक्षाशी निष्ठा राखत कार्य करणारे खरे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्याची ओळख ही तालुक्यातील एक सक्रिय कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळणार कार्यकर्ता म्हणून आहे .
तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अनेक नेते इतर पक्षात गेले असतानाही पांडुरंग भिकणे सकनुरकर यांनी काँग्रेस पक्षाची निष्ठा कायम राखत लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार सकनूर गावातून प्रथम क्रमांकावर ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे व
सकनूरकर हे नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण मा आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर मा जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर या भागाचे नेते राजनजी देशपांडे साहेब यांचे अत्यंत जवळचे विश्वासू खांदे समर्थक मानले जातात
माझं ध्येय राजकारण नव्हें तर काँग्रेस विचाराची सेवा आहे पक्षश्रेष्टीने संधी दिल्यास सकनूर गणातून निवडणूक नक्की लढवणार आहे. असे पांडुरंग भिकणे सकनूरकर यांनी ठामपणे सांगितले.
-----------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment