भाजपा कडून आरळी जिल्हा परिषद गटातून संतोष पाटील शिवशटृॆ यांनी निवडणूक लढवावी, जनतेतून जोरदार मागणी.


लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- आगीमी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने तयारीचा धडका सुरू केले असून आरळी जिल्हा परिषद गटातून संतोष पाटील शिवशटृॆ यांनी निवडणूक लढवावी.जनतेतुन तसेच कार्यकर्त्यातून जोरदार मागणी होत आहे. हा मतदारसंघ ओबीसी अधिकृत घोषणा झाली असून या निर्णयामुळे गटातील राजकीय समीकरणांमध्ये हालचालींना वेग आला आहे. संतोष पाटील शिवशटृॆ समाजकारण , शैक्षणिक कार्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सक्रिय आहेत . त्यांच्या जनसंपर्क आणि विकासाभिमुख दुष्टी कोणामुळे स्थानिका मध्ये विश्वास आणि लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि कार्यकर्त्यांमधील स्विकाराहेतेमुळे भाजपा कार्यकर्त्यां मध्ये त्यांच्या उमेदवारी बाबत उत्सवाचे वातावरण आहे . संतोष पाटील शिवशटृॆ हे अत्यंत नम्र आणि सार्वंशी मित्तभाषी, तरुण आरएसएस विचारसरणी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. स्थानिक पातळीवर अनेक गावांमधून संतोष पाटील शिवशटृॆ समर्थनार्थ चर्चा सुरू असून त्यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments