लोकन्याय न्यूज नेटवर्क
हिमायतनगर (राम चिंतलवाड) :- सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हदगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैडकीत हिमायतनगर तालुक्याचे उभरते नेतृत्व कैलाश बळीराम कांबळे यांची हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी तर गजानन जिदेवार आष्टीकर यांची रिपब्लिकन सेनेच्या मीडीया हदगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.रिपब्लिकन सेनेचे हदगाव हिमायतनगर विधानसभा अध्यक्ष महेंद्र धोंगडे यांनी नियुक्ती पत्र देउन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व महेंद्र धोंगडे आपल्या मनोगतात असे म्हणाले की रिपब्लिकन सेनेची गाव तेथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता ही संकल्पना मांडली येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालीका, नगरपंचायत या सर्व निवडणुका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीस हदगाव शहर अध्यक्ष चंद्रकांत भोरे,तालुका उपाध्यक्ष जनार्दन हाटकर,मीडीया तालुका अध्यक्ष मारोती काकडे,तालुका संघटक माधवराव आढागळे,युवा तालुका अध्यक्ष राष्ट्रदीप वाढवे, सुभाष गुंडेकर सरसमकर,दवणे साहेब उपस्थीत होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment