लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी (महेश पडोळे) :- तालुक्यातील युवा तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष महेश पडोळे हे पाच सहा वर्षांपासून शहरातील युवकांचे माता भगिनींचे,ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात त्याच बरोबर आपल्या प्रभागातील असलेल्या समस्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित करून सोडविण्याचे काम ते करत असतात त्यामुळे त्यांच्या प्रभागामधील
लोकांकडून भावी नगरसेवक म्हणून अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष महेश पडोळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे परवा उमरी मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आले असता त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांचे नाव घेत असतांना शहर अध्यक्ष महेश पडोळे यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख केला असल्या कारणाने महेश पडोळे यांनी सांगितले की,भावी पिढीच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समाजासाठी काही तरी करण्यासाठी मी उमरी पालिका निवडणुकीस राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभे राहण्याचा माणस करत असल्याचे सांगितले...
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment