घुमान यात्रेत पर्यावरण वाचवाचा संदेश


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (स्वाती सोनकांबळे) :- नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे आयोजित संत नामदेव जन्मानिमित्य घुमान यात्रेत पर्यावरण कवी एम. टी. कदम संत नामदेव व संत तुकाराम यांनी अभंगाच्या स्वरूपात सांगितलेले वृक्षवली आम्ही सोयरे...

गेला, गेला, अंहकार गेला झाला, झाला माणूस देव झाला..

आज संत तुकाराम आणि संत नामदेव आज असते तर त्यांनी तापमान वाढ कमी करण्यासाठी, लोकसंख्या कमी करण्यासाठी, कार्बन उत्सर्जन थांबवा यासाठी अभंग, प्रवचन, कीर्थनातून समाजाला मार्गदर्शन केले असते. 

कारण ग्लोबल वार्मिंग बद्दल मार्गदर्शन करणे आज काळाची गरज आहे.

याच गोष्टीचा विचार करून पर्यावरण जागृती करणारे, पर्यावरण काळीजवाहू शिक्षक एम. टी. कदम सध्या घुमान यात्रेत सामील आहेत. 

पंजाब दर्शनामध्ये ते पर्यावरण रक्षणाच्या संदेशाचे फलकच्या सह्याने पर्यावरण रक्षणाचे संदेश देत आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments