अर्धापूर शहरात कला साहित्य प्रतिष्ठान तर्फे दिवाळी पहाटचे आयोजन


लोकनेता न्यूज नेटवर्क

अर्धापूर प्रतिनिधी (आनंदराव मोरे) :- अर्धापूर येथील कला साहित्य प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी शहरातील तलाव परिसरात दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक - 20/10/2025 रोजी सोमवारी पहाटे पाच वाजता आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये भावगीत. भक्ती गीत. फिल्मी गाणे. तसेच लावणी, भारुड, यासारखे अनेक लोकगीताचे गायन सादर होणार आहेत. तरी अर्धापूर तालुक्यातील व शहरातील नागरिक बंधू-भगिनींनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. खासदार अशोकरावजी चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे. व सांगितीक मेजवानीचा व फराळाचा आस्वाद घ्यावा असे आयोजकातर्फे करण्यात आले आहे. आव्हानआपणास कळविण्यात आनंद होतो की,दि.20/10/2025 सोमवारी 'दिवाळी पहाट', सप्तसुरांची उधळण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी आपण सहकुटुंब मित्र परिवारासह उपस्थित रहावे ही विनंती.

प्रमुख उपस्थिती

माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण 

भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.

वेळ

पहाटे 05:30 वा.

आयोजक 

कला, साहित्य प्रतिष्ठान अर्धापूर

स्थळ 

तलाव मैदान अर्धापूर येथे सकाळी पाच वाजुन तीस मिनिटाने उपस्थिती राहवे

 ------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments