नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी शहरातील भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व उबाठाला मोठा धक्का!


लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- दि.30/10/2025 रोजी नंदनवन बंगला मुंबई येथे कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ.श्रिकांतजी एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात

कुंडलवाडी शहराचे काॅंग्रेसचे माजी नगराध्यक्ष डाॅ.सायना शेंगुलवार, तसेच उबाठा गटचे कुंडलवाडिचे उपतालुकाप्रमुख शंकर दत्तराम कोनेरवार, रमेश तेजराव गवते (उपशहर प्रमुख कुंडलवाडी उबाठा),बजरंग (बंटी)बालाजी साठे (युवा शहर प्रमुख उबाठा),साईनाथ राजेश्वर भोरे( विद्यार्थी काॅग्रेस अध्यक्ष कुंडलवाडी) संतोष भोसले यांच्या सह काँग्रेस व उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी मा.मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना नेते मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.

या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट अधिक मजबूत झाला असून स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.

खासदार डाॅ.श्रिकांतजी शिंदे साहेब यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत सांगितले की, “ शिवसेना शिंदे गट हा जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असून प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान दिला जाईल.”

या वेळी मा.मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना नेते मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव मा.बालाजी पाटील खतगावकर साहेब उपस्थित होते. प्रवेशामुळे नांदेड जिल्हा व कुंडलवाडी परिसरात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

-----------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments