लोकनेता न्यूज नेटवर्क
निलंगा (इस्माईल शेख) :- वलांडी : जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष नय्युम खाजामिय्याॅ शेख वलांडीकर यांचा ऐतिहासिक नगरी नाशिक शहरात रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी वृत्तपत्र यांच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजय माणिकराव हाळनोर यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात वाहन चालकांना न्याय देण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन उपोषण तसेच अहोरात्री ब्रेक डाऊन झालेल्या गाड्यांना मदत करण्यासाठी, कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन वार्ता न्यूज चैनल च्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक शहर नाशिक येथे शाहू फुले आंबेडकर विचार मंचावर हा सत्कार सोहळा हा दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रोटरी क्लब सभागृह नाशिक येथे संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारार्थी व महाराष्ट्र पब्लिकन वार्ता व वाहिनीचे मुख्य संपादक अनिल आठवले व कार्यकारी संपादक व वितरण समिती यांचा उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यामुळे जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्थेच्या सभासदांमध्ये उत्साहाचा वातावरण निर्माण झालेला आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment