लोकनेता न्युज नेटवर्क
अर्धापूर (आनंदराव मोरे) :- अर्धापूर तालुक्यात आढावा बैठक आत्माराम कपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अर्धापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक गुरुवार दिनांक १६/१०/२०२५ वार गुरुवार रोजी सकाळी १० वाजता मातोश्री मंगल कार्यालय तामसा रोड अर्धापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून *लोकनेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब* संबोधित करणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी *माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर साहेब* हे राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,माजी आ.मोहनराव हंबर्डे,माजी आ.अविनाश घाटे,माजी आ.सुभाष साबणे,*राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर साहेब*,नांदेड महानगर कार्याध्यक्ष माधव भाऊ पावडे,युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष,सर्व फ्रंन्टल सेलचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे ही विनंती.
आत्माराम पाटील कपाटे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आर्धापूर.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment