लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी (प्रतिनिधी) :- उमरी तालुक्यांतील मौजे कुदळा ता उमरी जि नांदेड येथील माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार किशननदादा गायकवाड कुदळेकर हे भाजपामधे तीस वर्षांपासुन सक्रिय असुन कै संभाजी पवार, माजी खासदार डि बी पाटील, कै आ गंगाराम ठक्करवाड, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, विद्यमान आ राजेश पवार, खा डॉ अजित गोपछेडे, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिंलवंडे इत्यादी च्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य केले असून जिल्हा कार्यकारिणी सदस्य, उमरी तालुका अध्यक्ष, जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, व प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य इतर पदांवर कार्य केलेले आहेत. त्याकाळी उमरी तालुक्यात भाजपाला पोषक वातावरण नव्हते तरी तेव्हा पासून किशनदादा गायकवाड यांनी पक्ष जीवंत ठेवण्यासाठी १९९१ - ९२ साली बि एस सी प्रथम वर्षाचा विध्यार्थी असताना सुद्धा शिक्षण अर्धवट सोडून ( इज्जतगाव ) अतांचे तळेगाव जिल्हा परिषद गटातुन अनुसूचित जाती पुरूष राखीव गटातून तर २००२ साली तळेगाव प.स. गण अनुसूचित जाती राखीव पुरूष मतदारसंघातुन निवडणूक लढविली होती. तर २००७ साली तळेगाव जिल्हा परिषद अनुसूचित जाती महिला राखीव गटातून, पत्नी सौ सावित्रीबाई किशनराव गायकवाड यांनी भाजपा - शिवसेना युवतीकडुन निवडणूक लढविलेली आहे. परंतु त्या काळी आताच्या प्रमाणे पक्षाचे कार्यकर्ते व आमदार, खासदार नसल्याने भाजपा - शिवसेनेचे तिकीट घेऊन निवडणूक लढविण्याची कोणी हिंमत करीत नव्हते परंतु त्या काळी सुध्दा किशनदादा गायकवाड कुदळेकर यांनी नुकसानाची पर्वा न करता भाजपाचे नेते कै संभाजी पवार, कै माजी आ गंगाराम ठक्करवाड, बालाजी बच्चेवार, आ हेमंतभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजप - सेना युवतीच्या वतिने निवडणूका लढवुन अनेक वेळा पराभव पचविला आहे. परंतु हार न मानता निस्वार्थीपणे. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, आ रविंद्र चव्हाण, प्रदेश अध्यक्ष, पालकमंत्री अतुलजी सावे, डाँ संतुकराव हंबर्डे, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष नांदेड, आमदार राजेश पवार, सौ पुनमताई पवार, खा अशोकराव चव्हाण, खा डॉ अजीत गोपछेडे, संजय कोडगे, मा अमरनाथ राजूरकर, मारोतराव कवळे गुरुजी, उद्योजक, माणिकराव लोहगावे, लक्ष्मण ठक्करवाड, डॉ माधवराव पाटील उच्चेकर, बालाजी पाटील गिरगावकर, ज्ञानेश्वर सावंत, तालुका अध्यक्ष ग्रामीण उमरी, बापुसाहेब पाटील कौडगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष, डॉ अमोल ढगे, जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी, इत्यादीच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य चालूच आहे.
आता तर महाराष्ट्र आणि देशात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार आहे. भाजपा नेतृत्वांने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मागील सत्तत झालेल्या पराभवांचा विचार करून कामाची पावती म्हणून तळेगाव जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढविण्यांची भाजपा नेतृत्वांने निवडणूक लढविण्याची संधी दिले तर किशनदादा गायकवाड कुदळेकर हे जिल्हा परिषद अनुसूचित जाती तर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असुन. पक्ष श्रेष्ठी नक्कीच मला संधी देतील अशी आशा व्यक्त केले आहेत. कारण १९९१ - ९२ पासून तळेगाव जिल्हा परिषद हा त्यांचा जुना मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघातुन गायकवाड यांनी अनेक वर्षांपासून निवडणूका लढविलेल्या आहेत आणि या तळेगाव गटात मतदारांशी त्यांचे जीवाळ्याचे घट्ट संबंध असल्यामुळे गायकवाड यांना तळेगाव जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी सहज शक्य होणार असून तळेगाव जिल्हा परिषद गटांचा विकास करण्यासाठी सदर गटातील मतदार माय - बाप नक्कीच मला नांदेड जिल्हा परिषदेमध्ये तळेगाव गटांचा प्रतिनिधी म्हणून पाठवतील या मध्ये कुठलीही शंका नाही. परंतु भाजपा नेतृत्वांने संधी दिली तर तळेगाव जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे अशी इच्छा व्यक्त केली असून किशनदादा गायकवाड यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्यासाठी कार्यकर्त्याला आव्हान केले आहे.
-----------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment