लोकनेता न्युज नेटवर्क
उमरी (प्रतिनिधी) :- उमरी शहरातील विविध भागातील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाले त्यांना आधार देण्यासाठी लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन पर भेट दिले त्याचबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या उदरनिर्वाहनासाठी आपल्या गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून छोटीशी आर्थिक मदत देत स्वतःच्या पायावर उभा करण्याचे काम केले गुरुजी फाउंडेशन जिल्ह्यात काम करत असताना अशा झालेल्या दुःखद प्रसंगी वेळोवेळी मदत करत असते याचाच प्रत्यय आज उमरी शहरात दिसून आला. यावेळी उमरी शहरातील संजय कुलकर्णी, श्रीनिवास अनंतवार, सुभाष पेरेवार,वसंत जाधव, गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप पाटील कवळे,माचेवाड सर,शरदजी, उत्तम आयेवार यांच्यासहअदि जन उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment