लोकनेता न्युज नेटवर्क
पेठवडज (प्रतिनिधी) :- आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकीची चाहूल लागताच पेठवडज सर्कल मध्ये सर्वसाधारण गटासाठी स्थानिक उमेदवार सौ.कालिंदाताई गोविंदराव शिंदे यांना मतदारांची पहिली पसंती असून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावात पाठिंबा पहावयास मिळत आहे. पेठवडज सर्कल मध्ये स्थानिक नेतृत्वांना जनतेने संधी देण्याचे ठरवले असल्याचे तेथील मतदारांकडून ऐकावयास मिळत आहे, पण आयात उमेदवार मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती च्या गटामध्ये चाचपणी करत असल्याचे व दौरे करत असल्याचे चित्र सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पहावयास मिळत आहे.
पेठवडज जिल्हा परिषद गटासाठी स्थानिक उमेदवार सौ.कालिंदाताई गोविंदराव शिंदे यांच्या नावाची चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहे. प्रत्येक गावात त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment