लोकनेता न्यूज नेटवर्क
सेनगाव (महादेव हरण) :- सेनगाव तहसील कार्यालय बनले घाणीचे साम्राज्य शासन एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवत असून सेनगाव तहसील कार्यालयामध्ये अक्षरशः येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो ,नाकाला रुमाल बांधून कार्यालयाचे काम करावे लागतात तर एकाच छताखाली तीन कार्यालयाचे कामकाज चालत असून रोज हजारो नागरिक या कार्यालयामध्ये कामाकरिता ये जा करत असतात तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर अक्षरशः नागरिकांना व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो, घाण वास येत असल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही गेल्या अनेक दिवसापासून सेनगाव तहसील कार्यालयामध्ये हळूहळू घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर आज अक्षरशः नागरिकांनी नाकाला रुमाल बांधून कार्यालयामध्ये प्रवेश करावा लागतो कर्मचाऱ्यांच्या कार्यालयामध्ये प्रतिबंध असलेला गुटक्याने ही भिंती रंगून गेल्या आहेत, एका छताखाली तीन कार्यालय असल्याने अनेक नागरिकांना घाणीचा सामना करावा लागतो तर आता तहसीलदार साहेब स्वच्छतेकडे लक्ष देतील का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे,
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment