बहुजन विकास आघाडी ऐतिहासिक व श्रध्दा स्थळाचा विकास साधणार !


लोकनेता न्युज नेटवर्क

परभणी (दत्तात्रय कराळे) :- लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व‌ कुशल नेतृत्वाखाली कार्यरत बहुजन विकास आघाडीने बिलोली शहराच्या नागरी विकास कामांचा विडा उचलला आहे. मुलभूत सोयीसुविधांबरोबरच लाखो भाविक भक्तांचं श्रध्दास्थान ठरलेली प्राचीन हजरत नवाब सरफराज खान शाहीद नावाची मश्जिद शहर व तालुक्याची ऐतिहासिक अशी आन-बान आणि शान आहे. औरंगजेबाचे सरसेनापती सरफराज खान यांचे कधीही विस्मरण न होणारी ती ओळख आहे. काला पत्थर की मश्जिद या नावानेही सुपरिचित अशा या मश्जिदचा मागील अनेक वर्षांपासून विकास प्रलंबित असून ती आजही वंचित आहे. तिचे अद्ययावत असे सुशोभिकरण करणे ही काळाची गरज आहे. ती केवळ अल्पसंख्याक समाजाचं आदरस्थान नसून समस्त हिंदूंचं ही ते शक्ती स्थान आहे. आम्ही इतरांसारखे जास्तीचं विघटन न करता सर्व धर्म समभाव आणि समता व बंधूत्व मानणारे आहोत. किंबहुना जेवढी श्रध्दा मश्जिदीच्या प्रती आहे, तेवढीच आस्था मंदीरांप्रती आहे. नव्हे, ती कायम असणारच. तद्वतच प्रसिद्ध असे श्री गुरुदेव दत्त या देवस्थानाचाही तेवढाच भरीव असा विकास करणे गरजेचं मानतो आहोत. जाती पातळीमध्ये तेढ निर्माण करुन राजकीय तोट्या शेतकऱ्यांचं काम आमचं नाहीये. ज्या महामानवाने देशाची घटना लिहिली, संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातीला हक्क मिळवून दिले, त्या बाबासाहेबांचं स्मारक दिसताच आम्ही नतमस्तक होत असतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळातही जर्जरावस्था सहन करुन त्यांनी सर्वप्रथम शाळा सुरू करुन महिलांसाठी सर्वप्रथम शिक्षणाची सुरुवात केली, शिक्षणाची गंगा वाहती ठेवली, त्यांचा तो त्याग, धाडस व महिलांप्रती असलेली तळमळ आम्ही आजही शिरसावंद्य मानतो. ज्या लहूजी साळवेंनी तळागाळातील व रंजल्या गांजल्यांसाठी जो आदर्श घालून दिला, तो एखाद्या दैवताप्रमाणे पूजतो. त्यांचा तो इतिहास आजही अजरामर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचं जे धारिष्ट्य दाखवू दिले, परस्त्रीबाबत जो आदर शिकवला, तो संपूर्ण मानव जातीची शान वाढवणारा असाच मानतो. तर, इंग्रजांशी निकराची झुंज देत मराठी पत्रकारिता जीवंत ठेवण्यासाठी ज्यांनी महान त्याग केला, त्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा तोच आदर्श आम्ही आजही एखाद्या तेजोमय दिव्यासारखा तेवत ठेवतो. एकूणच काय तर आम्ही सर्व धर्म समभाव मानतो, हे अभिमानाने सांगता येईल. 

      बिलोली शहराच्या सर्वांगिण विकासाची भूमिका घेऊन बहुजन विकास आघाडी मोठ्या धैर्याने मराठवाड्यात उतरली असून त्या अनुषंगानेच लक्ष केंद्रित करीत आहे. किंबहुना या निवडणुकीत विकास हाच एकमेव अजेंडा राहणार आहे. त्यामुळे विपुल पटणे यांना भरभरुन साथ देत खऱ्या अर्थाने विकासाला बळकटी देणे गरजेचे आहे. सर्व शहरवासीयांनी‌ बहुजन विकास आघाडीच्या पर्यायाने विपुल पटणे यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहतील, असा विश्वास आहे. एवढेच नाही तर या निर्णायक लढाईत पटणे यांच्या पारड्यात मतदानरूपी दान टाकून भरघोस असा विजय मिळवायचा आहे. आपले शक्तीशाली पाठबळ आणि भरभरुन आशीर्वाद निश्चितपणे आमच्याबरोबर असतील, असा ठाम विश्वास आहे. 

        शहरातील नागरिकांना दर्जेदार अशा पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. तसेच प्रलंबित प्रश्न व महत्वाच्या समस्या मार्गी लागल्या पाहिजेत. शिवाय, शहराची गरज लक्षात घेऊन नवनवीन प्रकल्प सुरू झाले पाहिजेत. तसेच या भूमीची ओळख म्हणून येथील ऐतिहासिक वारसा जपला गेलाच पाहिजे, ही आमची धारणा आहे आणि म्हणूनच या ऐतिहासिक भूमीचा आध्यात्मिक प्राचीन वारसा जोपासण्यासाठी विकासाची ती भगिरथ गंगा कोणत्याही परिस्थितीत बिलोलीत आणायची आहे. किंबहुना त्यासाठीच आपण कर्मयोगी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे कुशल असे नेतृत्व स्वीकारले आहे. अभिमान व गर्व आहे की, बिलोलीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे, हे त्यांनी तात्काळ मान्य करत होय, मी तुमच्याबरोबर आहे असे त्यांनी स्वयंस्फूर्तीने सांगितले. ज्यांनी आपल्या विकासाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे आपले नेते हितेंद्र ठाकूर यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता आपण सर्वजण एकत्र निष्ठेने लढणार आहोत. विकास हाच अजेंडा ठरवून तेच लक्ष्य साध्य करायचे आहे. बिलोलीच्या माय-बाप जनतेने भरभरुन साथ दिली तर तो दिवसही नक्कीच जवळ असू शकेल, खरोखरच विकास म्हणून बघता येईल, अनुभवता येईल, याची आपण सर्वांनी जाणीव ठेवली गेली विजय निश्चितपणे आपलाच राहणार आहे. त्यामुळे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे हात बळकट करण्यासाठी विपुल पटणेंच्या विजयाचा हा प्रयोग अनोखा ठरला जाईल. विकास आणि विजयाचा हा प्रयोग बिलोलीपुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण मराठवाड्यात यशस्वी ठरला जाईल अशी खात्री आहे. विजयाचे शिल्पकार म्हणून तुमचे सर्वांचे उत्स्फूर्तपणे स्वागतच झाले पाहिजे. त्यामुळे बिलोलीच्या नागरिकांनी डोळ्यात तेल घालून सजग राहाआणि आपले कार्य सिद्धीस नेणे फार गरजेचे आहे. आपल्या विश्वास ही फार मोठी ताकद आहे. विश्वासाची ती ताकदच लोकाभिमुख अशा विकासाचे स्वप्न पूर्ण करु शकणार आहे. त्या विश्वासानेच आपली सर्वांची भरभरुन साथ मिळणे आवश्यक आहे. तुमची साथ, विरोधकांवर मात ठरली जाऊन तेच स्वप्न साध्य होईल याची खात्री आहे,  

        बिलोली नगरीतील समस्त नागरिकांचा वाढता विश्वास, हीच आमच्या जमेची बाजू असून त्यासाठी पारदर्शक नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारसरणी असेच आपले धोरण राहणार आहे. जेणेकरून बिलोलीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आपल्या सर्वांची ताकद वाढीस लागली जाऊन‌ त्याचा फायदा आगामी काळात जे जे करणे आवश्यक असणारं आहे, त्यासाठी तो उपयोगी ठरु शकेल. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिका तर बिलोलीकरांच्या साठी आहेच, त्याशिवाय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचीही सर्व ताकद बिलोलीकरांच्या पाठी राहिली जाऊन ती पणाला लावली जाईल, हा विश्वास असू द्या. त्यासाठी या निवडणुकीत एकजुटीने, निष्ठेने आणि पूर्ण ताकदीने विजयी होऊ. जेणेकरून बिलोली शहराला सर्वांगीण विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणे, हाच आपला सर्वांचा संकल्प राहणार आहे. असंही या निमित्ताने सांगता येईल.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments