हाडोळी गणात शिवसेनेचा जनतेचा लढा तेजीत! युवासेना तालुकाप्रमुख नंदाजी पाटील इंगळे यांनी पंचायत समिती निवडणूक लढलीच पाहिजे — सूरज गोविंदराव तेलंगे

नंदादीप पाटिल इंगळे

लोकनेता न्युज नेटवर्क
लोहा (प्रतिनिधी) :- हाडोळी (ता. लोहा) शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नंदाजी रामराव पाटील इंगळे (धावरीकर) यांनी आगामी पंचायत समिती हाडोळी गणातून निवडणूक लढवलीच पाहिजे, अशी ठाम मागणी शिवतेज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सूरज गोविंदराव तेलंगे यांनी केली आहे.
तेलंगे यांनी सांगितले की,
> “नंदाजी इंगळे हे गेली अनेक वर्षे जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत.
प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे, सामान्य माणसाचा आवाज बनलेले,
शिवसेनेच्या भगव्या विचारधारेवर चालणारे एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
हाडोळी गणाचा विकास वेगाने व्हावा, तर अशा तरुण व जनतेशी नातं जोडलेल्या नेत्यानेच ही निवडणूक लढली पाहिजे.”
त्यांनी पुढे सांगितले की,
आजच्या घडीला गावोगावातील समस्या, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या सगळ्या प्रश्नांवर
ठोस आणि जमिनीवर उतरून काम करणारा प्रतिनिधी हवा आहे.
नंदाजी इंगळे यांच्याकडे ते नेतृत्व गुण आहेत आणि त्यांच्यामुळे
हाडोळी गणाचा सर्वांगीण विकास शक्य आहे.”
या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून
हाडोळी गणात शिवसेनेचा झेंडा अधिक जोमाने फडकणार असल्याचे बोलले जात आहे.
 “जनतेचा माणूस – विकासाची हमी!”
हाडोळी गणातील नागरिकांमध्ये आता एकच चर्चा –
> “नंदाजी पाटील इंगळेच पंचायत समितीसाठी योग्य उमेदवार!”
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments