देगलूर महाविद्यालयात संविधान दिन साजरा.


लोकनेता न्युज नेटवर्क 

देगलूर (अमोल कुमार शिंदे) :- देगलूर :येथील देगलूर महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना भारत देशास अर्पण केली या अनुषंगाने सर्वत्र संविधान दिन साजरा करण्यात येत आहे.

देगलूर महाविद्यालयात रा.से.यो.वतिने संविधान दिन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्र. प्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

 तसेच यावेळी संविधान उद्देशिकेचे समूहवाचन करण्यात आले. 

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत संविधान दिनाचे आयोजन व विद्यार्थ्यांची भव्य रॅली शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली यावेळी उपप्राचार्य डॉ.एम एम चमकुडे,उपप्राचार्य डॉ. शेरीकर व्ही.जी पर्यवेक्षक एस एन पाटील अधिक्षक गोविंद जोशी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.गूरूडे शिक्षक;शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments