कुंडलवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सौ. प्रेरणाताई ताई गजानन कोटलावार भाजपात .



लोकनेता न्यूज नेटवर्क

कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- कुंडलवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सौ.प्रेरणा ताई गजानन कोटलावार यांनी काल नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व नांदेडचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पक्षप्रवेश करण्यात आले. नगराध्यक्ष सौ.प्रेरणा ताई गजानन कोटलावार यांचे फार दिवसापासून कुंडलवाडी शहरात व गल्ली गल्लीत नाव गाजत होते . व त्यांची ओळख कै.के रामलु साहेबांची नातसुन म्हणून ओळखले जात आहे. आणि कै.रामलु साहेबांची काही फार जुन्या गोष्टी अनेक लोकांच्या मनात आहेत. आणि सौ.प्रेरणा ताई गजानन कोटलावार कुंडलवाडीत काही प्रभाग मध्ये जाऊन तसेच काही गल्लीत जाऊन त्यांचे परिचय लोकां पर्यंत पोहोचले व काही लोकांनाच्या समस्या जाणून घेतल्यावर त्यांनी अनेकाना मदत दिले व निवडणुकीच्या पहिले काम करूत असे आश्वासन सुद्धा दिलेत लोकांच्या मनात एकच आहे आता नवीन चेहरा असे म्हणत सौ.प्रेरणा ताई गजानन कोटलावार यांच्यासोबत राहू असे अनेकजण म्हणत आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments