गोंडपिपरी नगरपंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात नगरपंचायतिच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..!


लोकनेता न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी (आशिष निमगडे) :- सध्या गोंडपिपरी नगरपंचायत या न त्या कारणामुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही नगरपंचायत येथील नवनियुक्त परीवीक्षाधिन कालावधीतील अभियंता आदेश मेश्राम यांच्याकडे आहे. हे हम करे सो कायदा अश्या भूमिकेमुळे नेहमी वादातच असतात आणि आता गोडपिपरी प्रभाग क्र. ८ मधील आठवडी बाजारातील परिसरात पेव्हर्स लावण्याचे काम २८ लाख ५० रुपयाची सुरू आहे. सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम असून मोठ्या प्रमाणात पैश्याचा अपहार करण्याच्या दृष्टीने काम पूर्ण ही केले आहे. हा विषय घेऊन नगर पंचायतीमध्ये अनेक नगरसेवका सोबत खटके सुद्धा उडाले आहेत. परंतु या अभियंताच्या वागणूकित कुठलाही फरक झाला नाही. 

हा अभियंता थातूरमातूर काम करून कमी जास्त ४ लक्ष रुपयाची गिट्टी न टाकताच काम करून घेत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात या नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची ओरड आहे.

चौकट..

असे अभियंते रुजू होतास अनेक निविदा सुद्धा कंत्राटदाराला हाताशी घेऊन नियमबाह्य पद्धतीने करीत आहे आवक जावक रजिस्टर व कागदपत्रे तपासल्यास खूप मोठा घोळ निदर्शनास येईल 

आणि आठवडी बाजारात सुरू असलेल्या कामा मध्ये कंत्राटदारशी संगणमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे या कामाची मोजमापे व बिल सुद्धा उरकले आहे. झालेल्या कामाची फेरतपासणी दुसऱ्या विश्वसनीय नगर अभियंत्या कडून केल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल

सुरेश चिलणकर, नगरसेवक,

गोंडपिपरी.

तसेच यांचेकडून नगरपंचायतीची कुठलेही काम विहित कालावधी अथवा नियमात होताना दिसत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी निकृष्ट कामे करून नगरपंचायततिची पुरती वाट लावलेली आहे. विकास कामाच्या चार निविदा असल्या की त्यातील दोन निविदा कंत्राटदाराशी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने करत असल्याच्या बाब या विभागात पहावयास मिळत आहे . सेवेच्या अल्प कालावधीत रुजू होतात इतके मोठे धाडस होत असेल तर अशा व्यक्तीकडून प्रशासनाला नेहमी तोटा सहन करावा लागेल त्यामुळे जनतेचा नगरपचायत कडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि शासनाच्या ध्येय धोरणाला तिलांजली मिळत असल्याची बाब या निमित्ताने पुढे येत आहे.

त्यामुळे या प्रकरणांची चौकशी करून वरिष्ठ प्रशासनाने वेळच दखल घ्यावी अन्यथा अश्या कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाला मोठी किंमत चुकवावी लागेल.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments