लोकनेता न्युज नेटवर्क
हिमायतनगर (विनोद चंदनवार) :- हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात सध्या रणधुमाळी सुरू आहे. सर्व प्रभागांचे आरक्षण जाहीर होतात इच्छुक उमेदवार सध्या विविध पक्षांच्या माध्यमातून पुढे येताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर युवा नेतृत्व तथा उद्योजक सुरज दासेवार यांच्या मातोश्री सौ सुनंदा नागेश दासेवार यादेखील प्रभाग क्रमांक एक मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण युवा नेतृत्व सुरज दासेवार यांचा प्रभाग क्रमांक एक मध्ये मोठा जनसंपर्क असून त्यांनी तयार केलेली युवकांची फळी ही निश्चितच आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाचं गमिक असल्याचे बोलल्या जात आहे. प्रभाग क्रमांक एक हा सर्वसाधारण महिलेसाठी खुला असून या ठिकाणी सुनंदा नागेश दासेवार या शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार म्हणून सध्या आघाडीवर आहेत. युवा नेते सुरज दासेवार हे भारतीय जनता पक्षामध्ये असताना २०१४ ते २०१९ पर्यंत ते भारतीय युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी आपली संघटन मजबूत केले तसेच ती सातत्याने प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात त्यामुळे राजकीय कार्या बरोबरच धार्मिक कार्यात देखील त्यांचं नेतृत्व मोठे आहे. तसेच त्यांच्या मातोश्री सुनंदा नागेशदासेवार यादेखील या प्रभागामध्ये सामाजिक धार्मिक विविध उपक्रमांमध्ये आपलं सहभाग नोंदवतात त्यामुळे प्रभागा मधील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. निश्चितच शिवसेना पक्षश्रेष्ठींनी सुनंदा नागेश दासेवार यांना उमेदवारी दिल्यास या ठिकाणी विजयश्री नक्कीच आहे, असे राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. त्याचबरोबर सर्व समाज देखील सध्या सुनंदा नागेश दासेवार यांच्याच नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment