लोकनेता न्युज नेटवर्क
उस्माननगर (गणेश लोखंडे) :- शेर हिद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे दि.२९ नोव्हेंबर रोजीआयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उस्माननगर ता.कंधार येथील तहेरिक - ऐ- टिपू सुलतान कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शेर हिद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या २७५ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीराचे उदघाटन शिराढोण येथील युवा कार्यकर्ते ॲड. देवराव पांडागळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा माजी उपसरपंच राहुल सोनसळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सदर तथा उपसरपंच बाशीद शेख , इंजिनियर जमील शेख , बालाजी ईसादकर , दत्ता पाटील घोरबांड , संदीप पाटील काळम , ढाले पाटील , पोलीस पाटील विश्वभंर मोरे ,सामाजिक कार्यकर्ते मनोज जमदाडे शिराढोणकर, गंगाधर भिसे , युवा कार्यकर्ते तेजस भिसे , पत्रकार अमजद खान पठाण , आमिनशा फकीर , मौलाना , यांच्या सह अनेकांची उपस्थितीती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर ध्वजारोहण देवराव पांडागळे यांच्या हस्ते फडकावण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे तहेरिक - ऐ - टिपू सुलतान कमेटीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व रक्तदान शिबीरासाठी हल हयात ब्लड बँक नांदेड यांनी रक्तदात्याचे संकलन केले. यावेळी तरुणांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर खिचडी वाटप करण्यात आले. यशस्वी होण्यासाठी मुस्लिम तरुण बांधवांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देविदास डांगे यांनी केले तर आभार तेजस भिसे यांनी मानले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment