लोकनेता न्युज नेटवर्क
परभणी (दत्तात्रय कराळे) :- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, मॉं जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी लक्ष्मीबाई, आणि बौध्द विहारसाठी सदैव नतमस्तक होणाऱ्या समाजाजमनाला जोडून ठेवणारं जिल्ह्यातलं महत्वाचं स्थान म्हणून पूर्णा शहराकडे आस्थेने बघितले जाते. तथापि त्याच पूर्णा शहराला हक्काच्या विकासापासून शासनाने कोसो दूर ठेवले आहे. ज्या कोणी ठेवले आहे, त्याचा कीस काढत बसण्यापेक्षा तालुका स्थान असूनही एखाद्या गावखेड्यासारखी बकाल अवस्था येणाऱ्या काळात तरी सुधारली गेली पाहिजे. जेणेकरून तालुक्याचं नव्हे तर एखाद्या जाल्हास्थानाला सेवा वाटला पाहिजे पूर्णा शहर तसंच अद्ययावत व नागरी मुलभूत सोयी सुविधांचे नामांकित शहर बनले गेले पाहिजे. अशी तळमळ, इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटी असणे गरजेचे आहे. किंबहुना तेच ध्येय उराशी बाळगून सौ.उज्ज्वलाताई कांबळे नावाच्या रणरागिणीला आपल्या सेवेसाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.
सौ.उज्ज्वलाताई कांबळे या उच्चविद्याविभूषित आहेत. एका नामांकित महाविद्यालयात त्या प्राध्यापक असून विद्यादानाचे पूण्यकर्म करीत आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडे वैद्यकीय ज्ञानाचं भांडार आहे. तद्वतच शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या उज्ज्वलाताई कांबळे यांच्या नसानसांत सामाजिक कार्याचा वसा भिनला गेला आहे. अशा सुसंस्कृत उज्ज्वलाताई कांबळे यांना जर पूर्णा शहराचं प्रथम नागरिक अर्थात नगराध्यक्षपदी भरघोस मतांनी विजयी केले गेल्यास समस्त पूर्णेकर आणि पूर्णा शहराचं भवितव्य निश्चितपणे उजाडलं जाईल हा विश्वास आहे.
राज्य व देशपातळीवरील राजकारणातील चाणाक्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते, ते शरदचंद्र पवार, संसदपटू तथा खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा लोकनेते हितेंद्र ठाकूर व अन्य मातब्बर नेत्यांचे सहकार्य घेऊन पूर्णा शहरातील समस्त मतदार राजे व वर्षानुवर्षे येथे स्थायिक असलेला हजारोंच्या संख्येतील आमचा समाज या सर्वांच्या आशीर्वादाने व कृपादृष्टीने घेतलेली ही झेप केवळ झेप न राहाता ती महत्वाकांक्षी अशी गरुडझेप ठरली जाईल, अशी खात्री आहे.
सर्व समाज बांधव आणि माय भगिनींनी माझ्यावर दाखविलेला विश्वास, त्यांची एकजूट हे सर्व माझ्यासाठी जमेची बाजू असून समाजबांधवांप्रमाणेच अन्य सर्व समाजाने आपली भगिनी समजून मला विजयासाठी मोलाचे सहकार्य करावे आणि भरभरुन मते द्यावीत असे विनम्र आवाहन प्रा.डॉ.उज्ज्वलाताई कांबळे यांना केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment