माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे संविधान मुख्याध्यापक दत्ता गादेकर यांचे प्रतिपादन



लोकनेता न्युज नेटवर्क

उस्माननगर (प्रतिनिधी) :- २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला होता. त्याची आठवण म्हणून 2015 साली केंद्र सरकारने हा दिवस संविधान दिन म्हणून जाहीर केला. , आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्य , समता , बंधुता , या मूल्याचा आणि त्याच्या रक्षणासाठी आपल्याला अधिकार देणार हा दस्ताएवेज आहे. देशात लोकशाही टिकण्यासाठी माणसाचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क आबादीत ठेवण्यासाठी संविधान हे आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक दत्ता गाडेकर यांनी केले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठ खुर्द येथे आज संविधान दिन विविध कार्यक्रमाने साजरा दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा शाळेचे मुख्याध्यापक श्री गादेकर सर व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. त्यानंतर संविधानाचे सार्वजनिक वाचन घेण्यात आले , गावातील प्रतिष्ठित श्री संतोष गवारे , श्री देविदास बाबळे , श्री सूर्यकांत इंगोले , संतोष गजभारे यांना संविधानाची उद्देश पत्रिका देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. संविधानाचे महत्त्व सांगणारे घोषणाबाजी जयजयकार करीत गावातील प्रमुख रस्त्याने प्रभात फेरी काढण्यात आली. संविधान दिनानिमित्त शाळेत भाषण स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. संविधानाचे महत्त्व श्री गादेकर सर यांनी सर्वांना सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे संचलन श्री पल्लेवाड सर यांनी केले . व आभार प्रदर्शन श्री कदम सरांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गादेकर सर ,श्री पल्लेवाड सर, श्री कदम सर, मोध्ये मॅडम सौ बिजमवार मॅडम सौ वडजे मॅडम,सौ जाधव मॅडम यांनी परिश्रम घेतले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments