व्ही.पी.के.उद्योग समुहाचे विक्रमी ५५७० मॅट्रिक टन ऊस गाळप पूर्ण - यु.जी.कदम जनसंपर्क अधिकारी.


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- व्ही.पी.के.उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.मारोतराव पाटील कवळे गुरुजी, सी.ई.ओ संदीप पाटील कवळे, यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रविवार रोजी व्ही.पी के. उद्योग समूहातील व्ही.पी.के.कारखाना सिंधी, डॉ.शंकरराव चव्हाण कारखाना कुसुमनगर, एम.व्ही.के. कारखाना कुसुमनगर - या तिन्ही कारखान्याचे सर्वाधिक ऊस गाळप ५५७० मॅट्रिक टन झाले आहे.

त्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, वाहतूक ठेकेदार, शेतकरी या सर्वांच्या सांघिक कामगिरीने सदरील यश संपादन झाले असून सर्वांचे हार्दिक अभिनंदन व येणाऱ्या पुढील काळात यापेक्षा जास्तीचे गाळप व्हावे यासाठी हार्दिक शुभेच्छा

यु.जी.कदम जनसंपर्क अधिकारी यांनी दिल्या आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments