लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (प्रतिनिधी) :- ६ जानेवारी २०२६ मंगळवार रोजी उस्माननगर येथे मराठी पत्रकार दिन तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम उस्माननगर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास उस्माननगर येथील पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी संजयजी निलपत्रेवार साहेब यांच्या हस्ते संपादक बाजीराव पाटील गायकवाड कळकेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलिस अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच,उपसरपंच, कृषी उत्पन्न समिती सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी
सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग लाभला तसेच उस्माननगर येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment