लोकनेता न्यूज नेटवर्क
बिलोली (प्रतिनिधी) :- नबाजी कुडकेकर, तालुका बिलोली येथील कारला फाटा येथे 17 जानेवारी 2026 शनिवार रोजी आठवडी बाजार भरण्यात सुरुवात झालेली आहे आठवडी बाजारचे उद्घाटन सगरोळी सर्कलचे मा.जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील शिंपाळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बोळेगाव, कारला बुद्रुक, जुने नवीन गाव, येसगी जुने गाव, नवीन गाव,बाबळी येथील सर्व गावातील जनतेला ह्या बाजारचा फायदा होईल भविष्यात बाजारपेठ वाढेल अशी अपेक्षा सर्व जनतेने केलेली आहे. भाजीपाल्याच्या सोयीसाठी उपयोगी ठरलेला आहे ही कल्पना बऱ्याच वर्षापासून गंगाधर प्रचंड यांचे हे सपने आज प्रत्यक्षात बघण्यात मिळाले आहे. आजच्या शनिवार आठवडी बाजार मध्ये शेतकरी व शेजारील गावातील नागरिकांत आनंदाचे वातावरण दिसत होते. उपस्थित मांजरा बचाव चे अध्यक्ष गंगाधर प्रचंड, हनुमंत पाटील बोळेगावकर, साईनाथ छप्पेवार , कारला खुर्द चे उद्योजक चंद्रकांत लोखंडे, माझी तंटामुक्त अध्यक्ष शेख नजीरसाहब, गावातील पोलीस पाटील अशोक कांबळे,सिद्धार्थ वाघमारे, भावी पंचायत समिती सदस्य यादव देवराव कुडकेकर, यादव मरीबा कुडकेकर, गजानन शेळके, शिवाजी गाडेकर, कारला खुर्द येसगी येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment