कैलास गोरठेकर यांच्या आपीलला हायकोर्टाने याचिका फेटाळली कोर्टाचा निकाल संदीप पाटील कवळे यांच्या बाजूने लागला.


लोकनेता न्युज नेटवर्क 

नांदेड (बाजीराव पाटील) :- नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास श्रीनिवासराव देशमुख गोरठेकर यांनी मजूर सेवा सोसायटी अंतर्गत बनावट प्रमाणपत्र जोडून संचालक पदाचे निवडणूक लढविली यात गोरठेकर विजयी झाले होते. परंतु प्रतिस्पदी साखर सम्राटाचे सुपुत्र संदीप मारोतराव कवळे यांनी त्यांच्या बनावट प्रमाणपत्राच्या पुरावे घेऊन नांदेडच्या न्यायालयात धाव घेत न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट केले.तेंव्हा सदरच्या नांदेड न्यायालयाने कागदपत्राची तपासणी केली असता संचालक

 कैलास देशमुख गोरठेकर यांचे मंजूर सेवा सहकारी चे कागदपत्रे बनावट आढळून आले तेव्हा नांदेडच्या न्यायालयाने संचालक पद अवैध ठरवले. कैलास गोरठेकर यांनी अपिल याचिका औरंगाबादच्या कोर्टात दाखल केले होते. तेव्हा औरंगाबादच्या खंडपीठाने स्थगितीचे आदेश दिले होते. तेव्हा संदीप मारोतराव कवळे यांनी पुराव्यासह आणि नांदेडच्या कोर्टाच्या निकालाची प्रत घेऊन हायकोर्टात याचिका दाखल केली परंतु हायकोर्ट यांनी कैलास देशमुख गोरठेकर याची कागदपत्राची तपासणी केली असता ते बनावट आढळून त्यांची याचीका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक कैलास गोरठेकर यांच संचालक पद रद्द झाले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments