वैष्णव गडावरील राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्कार जाहीर


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (गोविंद मोरे) :- लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र कलंबर (खु.)येथील वैष्णव गडावरील श्री संत निवृत्ती महाराज व श्री संत मोतीराम महाराज संस्थानाच्या तिसऱ्या वर्धापन दिना निमित्ताने "राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्कार 2025 या मानाच्या पुरस्कारासाठी राज्यभरातून शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतीक,राजकीय,धार्मिक,आरोग्य,कृषी,आरोग्य,क्रीडा,प्रशासकीय,प्रबोधन आदिसह विविध क्षेत्रातील आलेल्या असंख्य प्रस्तावातून त्या त्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य असणाऱ्या योग्य व्यक्तीची निवड आज घोषीत करण्यात आली.या परस्काराचे वितरण 18 डिसेंबर 2025 रोज गुरुवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. पुरस्कारासाठीच्या निवड समितीचे अध्यक्ष राज्याचे पुर्व शिक्षण संचालक डाँ.गोविंद नांदेडे,निवड समितीचे सदस्य शंकरराव जंगमे,लक्ष्मण सावळे,प्रा.सुरेशराव घोरबांड,व्यंकटराव जाधव,प्रा.धाराशिव शिराळे यांनी योग्य निकषाधारे पुरस्कारासाठी खालील प्रमाणे घोषित केले.राजकीय क्षेत्रात मा.आ.मोहन अण्णा हंबर्डे,नांदेड,उद्योग क्षेत्रातून मरणोत्तर कै.संभाजी पाटील उमरेकर यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र डाँ.सचिन उमरेकर नांदेड,सामाजिक क्षेत्रात सौ.निधी शर्मा,पुणे,आरोग्य क्षेत्रात डाँ.उन्केश्वर पवार नांदेड,धार्मिक पुरस्कार क्षेत्रात मरणोत्तर कै.रामेश्वर तोष्णीवाल त्यांचा पुरस्कार स्विकारणार वंशज दुर्गाप्रसाद तोष्णीवाल नांदेड,शैक्षिणिक पुरस्कार प्रा.ललिता मुकुंदराव बोकारे नांदेड,सौ.विद्याताई कहाळेकर,कृषी पुरस्कार पंडितराव श्रीपतराव मोरे नांदेड,विद्युत क्षेत्रात श्री जाधव साहेब आदिची निवड जाहिर केली आहे.ह्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments