लोकनेता न्युज नेटवर्क
शिराढोण (लक्ष्मण पांडागळे) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज 06 डिसेंबर रोजी विविध माध्यमांतून अभिवादन करण्यात आले. यामध्ये सकाळी पंचशील बुद्ध विहार व ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले सकाळ च्या सत्रात अॅड.देवराव पांडागळे, पोलिस पाटील कैलास कागदेवाड सह बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
तर सायंकाळ च्या सत्रात "भव्य पणतीज्योती रॅली" च्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले ही महारॅलीची सुरुवात पंचशील बुद्ध विहार ते गावातील प्रमुख रस्त्यांनी येऊन पंचशील बुद्ध विहार शिराढोण येथे विसर्जित करण्यात आली.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौध्दाचार्य मनोज जमदाडे यांच्यासह मंगेश राक्षसे,
रुतिक जमदाडे, युवराज राक्षसे,स्वप्निल जमदाडे,सुशांत जमदाडे, रोहन राक्षसे, वैभव जमदाडे,अभिजित राक्षसे, गणेश जमदाडे सह सर्व युवा कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
सदरील अभिवादन कार्यक्रमास पोलिस प्रशासनाचेही सहकार्य लाभले याबद्दल आभार मनोज जमदाडे यांनी मानले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment