देगलूर (अमोल कुमार शिंदे) :- हिवाळी अधिवेशनात देगलूर–बिलोली विधानसभा मतदारसंघाशी संबंधित विविध ज्वलंत प्रश्न प्रभावीपणे मांडल्यानंतर अधिवेशन संपताच आ. जितेश अंतापूरकर थेट मतदारसंघात दाखल झाले आणि सर्वसामान्यांच्या जनसेवेत तत्काळ रुजू झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
अधिवेशनादरम्यान आ. अंतापूरकर यांनी पिकविमा प्रश्न, सोयाबीन हमीभाव केंद्रांवरील खरेदी नियमावलीत बदल, रस्ते बांधकामासाठी विशेष निधी, अवैध वाळू वाहतूक, घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची मागणी, बाभळी बॅकवॉटरमुळे बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व त्यासाठी गडचिरोलीच्या धर्तीवर मावेजा, बिबट्याचा बंदोबस्त तसेच दिवसा वीजपुरवठा यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर आक्रमक भूमिका घेत सभागृहासह राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.
अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात परतताच त्यांनी तडखेल येथील गॅस दुर्घटनेतील पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सुगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आत्मराम पाटील यांच्या घरी जाऊन सात्वन भेट दिली. तसेच डोणगाव (खू.) येथे हरीनाम सप्ताहानिमित्त आयोजित काला कीर्तनाला उपस्थित राहून बाळूमामांचे दर्शन घेतले. यावेळी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करून ग्रामस्थांशी संवाद साधला. उपस्थित गावकऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देशही गावकर्या समक्ष संबधित अधिकारी यांना त्यांनी दिले.
अधिवेशनातील प्रभावी मांडणी आणि त्यानंतर मतदारसंघात दाखवलेली तत्परता यामुळे आ. जितेश अंतापूरकर यांच्या कार्यक्षमतेचे व लोकाभिमुख नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असून, “आमदार अधिवेशनातही आणि मतदारसंघातही तितक्याच जोमाने कार्यरत” असा संदेश जनतेत जाताना दिसत आहे.
चौकट.
अधिवेशनातून थेट गावकुसात भेट देत आ.अंतापूरकरांचे कार्यक्षम व जनहित तत्परता दिसून येत असल्याचे प्रतिक्रीया नागरीकातून ऐकावयास मिळत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment