लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (अविनाश कदम) :- कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे मराठी ग्रामीण विभाग पत्रकार संघाच्या वतीने अल्पावधीतच संपादक म्हणून पत्रकारिता क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे विशेषतः ग्रामीण भागातील विविध विषयांवरील वार्तांकन,बातम्यांना प्रसिद्धी देणारे पत्रकार बाजीराव पाटील कळकेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
उस्माननगर येथील उदासीबुवा चौकातील पांडागळे यांच्या कृषी सेवा केंद्र इमारतीत शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषी सेवा केंद्राचे मालक बापूराव रघुनाथ दादा पाटील पांडागळे यांच्या वतीने शाल श्रीफळ,पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार गणेश लोखंडे (अध्यक्ष), पत्रकार माणिकराव भिसे (उपाध्यक्ष), पत्रकार लक्ष्मण कांबळे (कोषाध्यक्ष),बापूराव रघुनाथ दादा पाटील पांडागळे,सुभाष पाटील पांडागळे ,फैजूशेठ , गजानन लोंढे पाटील,नागेश पाटील यांच्या सह मित्र परिवार उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment