लोकनेता न्युज नेटवर्क
लोहा (राजाराम फाजगे) :- लोह्यात बुलडाणा अर्बन को.सोसायटीच्या वतीने काढण्यात आलेल्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे विमोचन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुलडाणा अर्बन को.सोसायटीच्या वतीने व्यापारी, शेतकरी, ग्राहक यांच्या सेवेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक भाईजी, संस्थेचे अध्यक्ष सुकेशजी झंवर,जनरल मॅनेजर कैलास कासट,विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली २०२६ ची उत्कृष्ट दिनदर्शिका काढण्यात आली.
सदरील दिनदर्शिकेचे विमोचन लोहा येथील बुलडाणा अर्बन च्या शाखेत दि. २२ डिसेंबर रोजी लोहा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे,सचिन पाटील चिखलीकर,लोहा न.प.चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पाटील पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निरिक्षक नेताजी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव पावडे, अॅड के.एम. पवार, विलासराव सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष दता वाले,नवनिर्वाचित नगरसेवक केशवराव मुकादम, नगरसेवक भास्कर पाटील पवार, नगरसेवक पंकज परिहार, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, नगरसेवक गणेश बगाडे, नगरसेवक छत्रपती धुतमल, नगरसेवक नारायण येलरवाड, नगरसेवक करीम शेख,भास्कर बोडके,
बुलडाणा अर्बन को.सोसायटी लोहा शाखेचे शाखा व्यवस्थापक केशव शेटे, सहव्यवस्थापक पांचाळ, कर्मचारी प्रविण कदम, श्रीकांत ढगे,ऋषी खरात,घंटे मॅडम, देशमुख मॅडम, अंकुश गिते,सतीश बालशेटवाड, सचिन महाजन, अल्पबचत प्रतिनिधी बालाजी इरमलवार, किशोर गुडणेवार, ठेविदार, कर्जदार, ग्राहक आदी उपस्थित होते.
चौकट
बुलडाणा अर्बन च्या वतीने लोहा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पाटील पवार व सर्व नगरसेवकांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक भास्करराव पाटील पवार यांनी केले तर आभार बुलडाणा अर्बन लोहा चे शाखा व्यवस्थापक केशव शेटे यांनी मानले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment