महाराणा प्रतापसिंहजी राजपूत क्षत्रिय समाज समिती, नांदेड तसेच महाराष्ट्र राज्य क्षत्रिय संघ आणि राणा ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने २१ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वधू–वर परिचय संमेलनाचे आयोजन


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- राज्यस्तरीय वधू वर परिचय संमेलनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ओम गार्डन, कवठा, नांदेड येथे दि.२१ डिसेंबर २०२५ रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी व संयोजन समिती अध्यक्ष तथा राणा ग्रुप चे अध्यक्ष अमरसिंह चौहान, मोहनसिंह तौर यांनी दिली आहे.

हे संमेलन स्वर्गीय देवीसिंह कुँवरसिंह चौहान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पणन व राजशिष्टचार मंत्री मा.ना.श्री जयकुमारजी रावल हे राहणार आहेत.यावेळी खा.अजित गोपछडे, आ.हेमंत पाटील, आ.बालाजीराव कल्याणकर, आ.आनंदराव बोंढारकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेमध्ये एक हजारापेक्षा जास्त वरवधूचे परिचय छापण्यात आले आहॆ.तसेच विविध लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. 

या राज्यस्तरीय सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.स्वागत समितीत राणा ग्रुपचे सर्व सदस्य तसेच राणी पद्मिनी राजपूत महिला ग्रुपच्या सदस्यांचा समावेश आहे. स्टेज व्यवस्था समितीत ॲड. दिलीपसिंह ठाकूर, बालासाहेब कच्छवे व गणेशसिंह ठाकूर, तर हॉल व बैठक व्यवस्था समितीत प्रकाशसिंह परदेशी, संजयसिंह ठाकूर व शैलेशसिंह चौहान यांचा समावेश आहे.भोजन समितीची जबाबदारी रतनसिंह चौहाण, रघुवीरसिंह हजारी, किशनसिंह चंदेल व विजयसिंह ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्थेची जबाबदारी गंगासिंह ठाकूर यांच्याकडे असून, निवास समितीचे नेतृत्व संजयसिंह अवस्थी करणार आहेत.स्मरणिका वितरण समितीत डॉ.लखनसिंह चौहान,करणसिंह चौहान, किशनसिंह चौहान, सूरजसिंह चौहान, व राहुलसिंह तौर कार्यरत राहणार आहेत.कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची जबाबदारी ॲड. दिलीपसिंह ठाकूर व देवेंद्रसिंह चंदेल सांभाळणार आहेत.वधू–वर पालक संवाद समितीत हनुमानसिंह चौहान व बाबूसिंह चौहान काम पाहणार आहेत.

मुख्य प्रवेशद्वारावरील स्वागत व महिला सहाय्याची जबाबदारी राणी पद्मिनी ग्रप व सर्व राजपूत महिला ग्रुपकडे देण्यात आली आहे. तसेच राजपूत समाज सेवा संघटनेसाठी सक्रिय कार्यकर्त्यांच्या सत्काराची जबाबदारी शरदसिंह चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

राणा ग्रुपने गेल्या सुमारे पंचवीस वर्षांपासून समाजसेवा, शिक्षण, संस्कार, सामाजिक एकता व नेतृत्वनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याच परंपरेचा पुढचा टप्पा म्हणून हे राज्यस्तरीय वधू–वर परिचय संमेलन आयोजित करण्यात येत आहे.या संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्व बंधू–भगिनींसाठी अल्पोपहार व भोजनाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली असून समाजातील इच्छुक वधू–वर व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments