लोकनेता न्युज नेटवर्क
वाघोली (संतोष कदम) :- दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता वाघोली येथे रायसोनी कॉलेज जवळ माई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्जेराव भाऊ वाघमारे ( विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष भीमा कोरेगाव), हिरामण भाऊ वाघमारे (वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष)
आदित्य कांबळे (अध्यक्ष समाधान हॉटेल उद्योग समुह) शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
इंजिनिअर. अंकुश दिपक लहूपंचाग आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ. रेणुका लहूपंचाग या दांपत्यानी मोठी स्वप्ने उराशी बाळगुन त्याप्रमाणे अतिशय जिद्द मेहनतीने वाटचाल करीत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
आपण बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरवत द कॅफे अँड हाऊस ऑफ केक्स नावाचं लेआऊट चालु केले.
या कंपनीचे उद्घाटन सर्जेराव भाऊ वाघमारे, हिरामण भाऊ वाघमारे यांच्या हस्ते रिबीन कापुन करण्यात आले.
अतिशय मुद्देसूद सूत्रसंचलन हिराभाऊ वाघमारे यांनी केले तर सर्जेराव भाऊ वाघमारे यांनी आपले मतं व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. आपल्या कंपनीने भविष्यात सामाजिक कार्य, पर्यावरण आणि आरोग्य,शिक्षण क्षेत्रातही सामाजिक बांधिलकी जपावी ही अपेक्षा व्यक्त केली.
आदित्य भाऊ, मयुर सर, इंजिनिअर. अंकुश दिपक लहूपंचाग सर व ईतर मान्यवरांनी यांनी देखील आपली भूमिका मांडली.
इंजिनिअर. अंकुश दिपक लहूपंचाग ,
सौ. रेणुका अंकुश लहूपंचाग, मयुर कोत्तावार, इम्तियाज अली ह्या सर्वांचे ही कंपनी चालवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. अतिशय एकमेकांच्या विश्वासाने आणि सक्रियतेने ह्या कंपनील कामाचे व्यवस्थापन चालत आहे. विविध मान्यवरांसह पोपट गायकवाड, विशाल आदमाने, नितीन नागदिवे, प्रमोद सुर्यवंशी, मयुर तायडे हे उपस्थित होते.
चौकट
"माई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी उभी करेपर्यंतचा संघर्षमय प्रवास काहीसा वाट्टेल तितका सोप्पा नव्हता, पण स्वतःला झोकून देत, अपयश पचवतआम्ही पुढे सरसावलो.
मयुर सर, इम्तियाज अली ह्यांनी देखील मोलाची साथ दिली. माझ्या कुटुंबाची प्रत्येक टप्यावर साथ लाभली.
ह्या कंपनी रुपी रोपट्याच रूपांतर एका वटवृक्षांमधे करायचा निर्धार आहे.
महाराष्ट्रभर अशीच व्याप्ती वाढवण्यामध्ये
आम्ही कार्यरत राहु. विविध बेकरी प्रोडक्ट ची गुणवत्ता वाढवण्यासाठी व चांगले पदार्थ लोकांपर्यंत पोहचवत राहु.
सौ.रेणुका अंकुश लहुपचांग
संचालिका आणि संस्थापक
द कॅफे अँड हाऊस ऑफ केक
(माई फूड्स प्रायव्हेट लिमिटेड)
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment