लोकनेता न्युज नेटवर्क
लोहा (राजाराम फाजगे) :- लोहा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा कै. जिजाबाई व्यंकटराव मुकदम (चव्हाण) यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शुक्रवार, दि. 02 जानेवारी 2026 रोजी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने सकाळी 10.00 वाजता दुग्ध अभिषेकाचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर दुपारी 12.00 ते 3.00 या वेळेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम व्यंकटेश गार्डन मंगल कार्यालय, लोहा येथे संपन्न होणार आहे.
कै. जिजाबाई मुकदम यांनी आपल्या कार्यकाळात लोहा शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य केले. त्या सामाजिक, राजकीय व सार्वजनिक जीवनात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा जवळचा संपर्क होता. त्यांच्या जाण्याने लोहा शहराने एक कर्तव्यदक्ष नेतृत्व गमावले आहे.
या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री. माणिकराव व्यंकटराव मुकदम (चव्हाण), श्री. नारायणराव व्यंकटराव मुकदम (चव्हाण), श्री. केशवराव व्यंकटराव मुकदम (मुकदम), श्री. माधवराव व्यंकटराव मुकदम (चव्हाण) व समस्त मुकदम (चव्हाण) परिवाराच्या वतीने सर्व नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment