लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (गोविंद मोरे) :- नांदेड शहरा पासून जवळ पण हिगोंली या जिल्हातील एक मोठे गाव जवळा पांचाळ,ता, कळमनुरी, नावाचे गाव आहे. इथली लोकसंख्या तीन -चार आसपास असेल. सारी शेतकरी कुंटूब कष्ट करुन हरी हरी म्हणत नांदणारी होती.याच एका कुंटूबातील श्री ईश्वर महादुअप्पा दासे हा तरुण गावातले शिक्षण घेवून पुढे घर सोडून शिक्षणासाठी नांदेडचा डांबरी रस्ता एकट्यानेच नीट धरलेला होता. आपले भविष्य उज्वल करण्यासाठी ग्रामीण भागातला हा तरुण नांदेडला काटकसरीने शिक्षण घेत आपल्या स्वबळावर काही तरी कष्ट करुन जीवनाची सुरुवात करण्यासाठी सन १९९२-९३ ला पोलीस विभागात प्रयत्न केले.त्या विभागाच्या विविध परीक्षा देवून उर्तीण झाले.या मधून जवळा या गावातून पोलीसाची वर्दीतला पहिला तरुण म्हणून श्री ईश्वर दासे यांनी मान पटकावला.
पोलीसाची वर्दी परिधान करुन मोठ्या अभिमानाने प्रथम देगलूर या शहरातून त्यांनी सुरुवात करुन जीवनाची सुरुवात केली.हे कर्तव्य पार पाडत त्यांचे दोनचे चार हात करुन लग्न करत अजून जवाबदारी वाढवली.अतिशय शांत,संयमी असलेला स्वभावामुळे त्यांनी दोन्ही कर्तव्य व्यवस्थित पार पाडत पुढे मग मनाठा,तामसा,जिल्हा विशेष शाखा, शहर वाहतूक शाखा असा मोठा प्रवास करत राहिले.खरे तर पोलीस शब्दात दरारा तर आहेच आणी असावा ही लागतो परंतु त्या ही पेक्षा पोलीस यांना समाजा मध्ये मिळायला पाहिजे तेवढी समाज प्रतिष्ठा कधी मिळत नाही.त्या मागे विविध कारणे असू ही शकतात.लिपीक आणी पोलीस या पदाच्या वाट्याला समाज मध्ये चांगले कमी आणी वाईट,बदनामकारकच नाव नेहमी जास्त चर्चेत राहीलेले आहे.ज्यांच्या नावात ईश्वर त्यानुसार कायम जगणारे श्री ईश्वर दासे जरी पोलीस विभागात असले तरी त्यांनी आपला सत्याचा रस्ता काही सोडला नाही.लबाड काही कधी बोलता आले नाही.खोटे काही इकडचे तिकडे करता आले नाही.
मुळात त्यांचा स्वभावच सरळ असल्यामुळे त्यांना समोरच्या कडून अधिकचे कधी काही मिळाले नाही.त्यांना कधी तशी अपेक्षा ही नव्हती.त्यामुळेच समाधाकारक,निरोगी जीवन कायमच जगता आले.त्यांचा स्वभाव रस्ता सोडून काही वेगळे करण्याचा नसल्यामुळे कुठले काही जमले नाही आणी जमवता ही आले नाही. तरी त्यांच्या प्रामाणिक पार पाडलेल्या कर्तव्यातून,चांगले केलेल्या लोकातून दुवा मात्र नक्कीच भरपुर मिळालेली आहे.
पोलीसाच्या नोकरीवर त्यांनी आपला प्रपंज व्यवस्थित चालवत एक कुंटूब प्रमुख म्हणून चांगले संस्कार,उच्च शिक्षण लेकरांना देत मुलीच लग्न करुन मुलाला डाॅक्टर केलेले आहे. नांदेड शहरात बॅकेच्या सौजन्याने एक छोटे सुंदर घर तेवढे निर्माण करता आले.
बाकी मग उभ्या आयुष्यात कधी कुठले व्यसन लागले नाही की,कधी पगार सोडून इतर चार पैसे खिशात दिसले नाही.
त्यामुळेच त्यांनी पोलीस विभागात 33 वर्षे सेवा बजावून ही कुठली शिक्षा मिळाली नाही आणी फार मोठे काही बक्षिस ही मिळाले नाही.जे काही सेवा जिथे जिथे बजावली तिथे त्यांनी केवळ नाव तेवढे मिळवले.या प्रामाणिक कर्तव्यातूनच मनाठा पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना कामावर पोलीस गाडीचा मोठा अपघात होवून गाडी पलटी झाली तरी श्री ईश्वर दासे यांच्या अंगाला खरचटले ही नव्हते.हे सारे प्रामाणिक,स्वच्छ कर्तव्यातून लोकांच्या मिळालेल्या प्रेम,
आपुलकीचे हे फळ आहे.श्री ईश्वर दासे हे नियतवयोमाना नुसार उद्या दिनांक ३०/११/२०२५ रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत.या निमीत्त त्यांना नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक मा.अविनाश कुमार यांनी त्यांचा सत्कार करुन निरोप समारंभ देण्यांत येणार आहे.
खरे तर श्री ईश्वर दासे यांच्या पोलीस दलातील निवड ते सेवा निवृत्त होण्या पर्यतचा येवढा मोठा आयुष्याचा सुर्वण काळ,प्रवासाचा मी त्याचा साक्षिदार आहे.माझ्या साठी हा काळ प्रेरणादायी आहे.माझे बालपण ते आता पर्यत त्यांनी माझ्या परिवाराला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केलेले आहे.आता पुढे सेवा निवृत्ती नंतर निरोगी राहण्यासाठी त्यांना भावसार चौकातील बालाजी मंदिरा मध्ये नियमीत योगाचे महत्व,योग सोबत असेल तर जीवन किती सुंदर आहे.याचे महत्व सांगत योग शिबीर घेवून अनेकांना योगाचे प्रशिक्षण देतात.योग गुरुच्या नवीन भुमिकेत पुर्ण वेळ दिसत आहेत.या सर्व योगातून उरलेल्या पुढे दिवस भराचा वेळ वडलोपार्जित शेती कडे आनंदाने घालवून निसर्गाच्या सहवासात राहतात.असे निरोगी,निस्वार्थ मनाचे पोलीस असलेले व्यक्तीमत्व आताच्या काळात दुर्मिळच पाहायला मिळेल.
श्री ईश्वर दासे यांच्या पुढील सेवा निवृत्तीच्या आयुष्याच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा....
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment