महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बोगस शाळेविषयी विचारला शिक्षणाधिकाऱ्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (गोविंद मोरे) :- इतर राज्यातील संस्थाचालकांकडून नांदेड येथे शासनाची कुठलीही परवानगी न घेता अवैधरित्या शैक्षणिक संस्थेच्या आड पालकांची आर्थिक लूट संस्थाचालकाकडून चालवत असलेल्या श्री. चैतन्य टेक्नो स्कूल (गट क्र. 100) या शाळेविरुद्ध फसवणूक सह दंडात्मक कार्यवाही करावी तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत.

तेलंगाना राज्यातील संस्थाचालकांकडून “श्री. चैतन्य टेक्नो स्कूल” (गट क्रमांक 100) ही शाळा ग्रामपंचायत खुरगाव, नंदुसा रोड, मालेगाव रोड, तालुका नांदेड, जिल्हा नांदेड येथे कोणतीही शासकीय परवानगी, नोंदणी, मान्यता व आवश्यक कागदपत्रांशिवाय अवैधरित्या चालविण्यात येत आहे.

सदर संस्थेच्या माध्यमातून नांदेड शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणले जात असून, पालकांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारून आर्थिक फसवणूक केली जात आहे. 

शाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण विभागाचे नियम, सुरक्षा उपाय, शिक्षक पात्रता, इमारत सुरक्षितता, अग्निशमन सुविधा इत्यादी सर्व बाबींकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याची विश्वासार्ह माहिती मिळालेली आहे.

तसेच सदर संस्था महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अथवा संबंधित प्राधिकरण यांची कोणतीही मान्यता नसतानाही पालकांची दिशाभूल करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवत आहे, हे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आहे.

सदर शाळेची तात्काळ चौकशी करण्यात यावी.

शाळा अवैध आढळून आल्यास त्वरित बंद करण्याची कारवाई करण्यात तसेच 

पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याबद्दल संबंधित संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

नियमबाह्य शुल्क आकारणीबद्दल दंडात्मक/आर्थिक कारवाई करण्यात यावी.

संबंधित पालकांचे नुकसान भरपाईसंबंधी चे आदेश देऊन योग्य ती कारवाई नकेलीयास मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी नांदेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे आपल्या कार्यालयात समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष. दीपक स्वामी, जिल्हाध्यक्ष. रवी भाऊ राठोड, मनविसे जिल्हाध्यक्ष. शक्ती परमार, शहराध्यक्ष. शुभम पाटील, मनवासे जिल्हाध्यक्ष.संतोष सोनेवाड, अमर कोंडराजे, फारुख भाई.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments