लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- लोहा तालुक्यातील कलंबर (भोपाळवाडी) येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.४ जानेवारी २०२६ रविवार रोजी सकाळी ठीक १० ते १२ वाजेपर्यंत संजय गांधी विद्यालयाच्या मैदानावर समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर खुर्द चे संस्थापक सचिव कै.निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब यांच्या जयंती निमित्त गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा व ह.भ.प.सौ.वनीताताई प्रकाश पाटील मुंबई यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून लोहा तालुक्यातील कलंबर परीसरातील भाविक भक्तांनी तसेच सर्व राजकीय क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते सरपंच,उपसरपंच, चेअरमन,व्हा.चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष,पोलिस पाटील या मान्यवरांनी कै.निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब यांच्या जयंती उत्सवात सहभागी होऊन मुंबई येथील नामवंत सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.सौ.वनीताताई पाटील यांच्या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर खुर्द चे अध्यक्ष तथा संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर चे प्राचार्य मारोतराव पाटील घोरबांड साहेब यांनी केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
.jpg)

Post a Comment