वीर सावरकरांचे गीत क्रुझवर प्रथमच सामूहिकरीत्या पर्यटकांकडून अॅड .दिलीप ठाकूर यांचा सत्कार


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (गोविंद मोरे) :- “जयस्तुतै श्री महामंगले” हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अजरामर गीत चक्क भर समुद्रात, ८० मीटर उंचावरून क्रूझवर सामूहिकरीत्या गुणगुणण्याची अभूतपूर्व घटना पहिल्यांदाच घडली असून, या अनोख्या उपक्रमामुळे अंदमान सहलीवर गेलेल्या सावरकर भक्तांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अनोख्या उपक्रमाचे नेतृत्व धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. त्यांच्या सोबत ३४ राष्ट्रभक्तांचा सहभाग होता.

सहा दिवसांच्या अंदमान सहलीचे आयोजन ॲड. दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांनी केले. श्रीविजयपूर (पोर्ट ब्लेअर) ते स्वराज द्विप (हॅवलॉक) या क्रूझ प्रवासादरम्यान, दिलीप ठाकूर यांनी कॅप्टनची परवानगी घेऊन सर्व पर्यटकांना एकत्रितपणे ‘जयस्तुते’ गायचे आवाहन केले. याआधी स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नांदेडच्या पर्यटकांनी या गीताचा सराव केल्याने क्रूझवर गायन सुरळीत पार पडले.

विशेष म्हणजे, क्रूझवरील तब्बल ३०० प्रवाशांपैकी बहुतेकांनी नांदेडच्या पर्यटकांसोबत राष्ट्रगीत, वंदेमातरम आणि जयघोषात सहभाग नोंदवला. “भारत माता की जय”, “स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहें” या घोषणा संपूर्ण जहाजभर दुमदुमल्या. टाळ्यांच्या कडकडाटात या अभिनव प्रयोगाचे स्वागत झाले. अनेक प्रवाशांनी हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला, तर स्टाफसह अनेकांनी ॲड. ठाकूर यांच्यासोबत सेल्फी घेऊन त्यांच्या राष्ट्रप्रेमाचे कौतुक केले.

भाऊ ट्रॅव्हल्स आणि माय हॉलिडेजच्या वतीने मागील २६ वर्षांपासून अनेक धार्मिक यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या अंदमान सहलीत नांदेड, मुंबई, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, परभणी, लातूर, वसमत, हैद्राबाद येथील पर्यटक सहभागी झाले.या टूर मध्ये सहा दिवसांचा थरारक आणि सर्वसमावेशक प्रवास झाला. 

यात्रेत जल–भूमी–आकाश या तिन्ही माध्यमांतील प्रवासाचा अद्भुत संगम होता— नांदेड–हैद्राबाद रेल्वे प्रवास,हैद्राबाद–श्री विजयपूरम विमान प्रवास,

विविध बेटांवरील क्रूझ, स्टिमर व स्पीडबोट प्रवास,

सबमरीनमधून पाण्याखालची सागरी जीवनसृष्टी,समुद्रकिनाऱ्यांवरील पायपिट

सहलदरम्यान सेल्युलर जेल, राधा नगर बीच, रॉस आयलंड, नॉर्थ बे, हॅवलॉक आयलंड यांसारख्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात आली. वातानुकूलीत रेल्वे प्रवास, आरामदायी टेम्पो ट्रॅव्हल्स, तृतीय तारा हॉटेल्समध्ये निवास, वेळेवर रुचकर भोजन आणि मिनरल वॉटर यामुळे सर्व पर्यटक तंदुरुस्त राहिले. प्रवासभर ॲड. ठाकूर यांनी घेतलेले खेळ, अंताक्षरी, विनोदी किस्से आणि संवाद यामुळे सहलीची रंगत चढत गेली. संदीप मैंद, टूर मॅनेजर प्राजक्ता रामदासी, विशाल मुळे आणि किरण मोरे यांनी सर्वांची व्यक्तिगत काळजी घेतली.

प्रवासी मागणीनुसार विविध आगामी यात्रांची घोषणा करण्यात आली. एकोणतीस जानेवारीला अयोध्या,वाराणसी प्रयाग चा समावेश असलेली उत्तर प्रदेश टूर,एक फेब्रुवारीला नर्मदा परिक्रमा, दोन फेब्रुवारीला केरळ टूर,आठ फेब्रुवारीला गंगासागर यात्रा, सतरा जानेवारी ला दुसरी अंदमान सहल, एकोणीस फेब्रुवारीला राजस्थान स्पेशल यात्रा काढण्यात येणार आहे. याशिवाय अकरा मार्चमध्ये नेपाळ, तीन एप्रिल हिमाचल स्पेशल,विस एप्रिलला चारोधाम यात्रा, जून व जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

तिसऱ्या अंदमान सहलीतही ॲड. दिलीप ठाकूर, संदीप मैंद व त्यांच्या टीमने केलेल्या नियोजनबद्ध व्यवस्थेबद्दल पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.या वेळी राष्ट्रभक्तीचा क्रूझवरील अभूतपूर्व अविष्कार घडला.

क्रूझमध्ये प्रवासी साधारणतः शांत राहणे पसंत करतात. मात्र, क्रूझवर सामूहिकरीत्या वीर सावरकरांचे गीत गाणे हा प्रथमच घडलेला ऐतिहासिक क्षण असल्याचे सर्वांनी नमूद केले.ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नवोन्मेषी उपक्रमशीलतेचे, राष्ट्रभक्तीचे आणि आयोजन कौशल्याचे व्यापक स्तरावर कौतुक होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments