लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (स्वाती सोनकांबळे) :- सुप्रसिद्ध पर्यावरण कवी, वेद- वेदांत, गीतेचे अभ्यासक, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील गणित अध्यापक, निर्भीड पत्रकार, समाजसेवक श्री एम. टी. कदम यांना गांधी पीस फाऊंडेशन, नेपाळच्या वतीने मानद डॉक्टरेट
ही पदवी प्रदान करण्यात आली.कदम यांना पर्यावरणाबद्दल तळमळ आहे. पर्यावरण आणि मानवतेच्या क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत
उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या
कार्याची दखल घेऊन त्यांना
मानद डॉक्टरेट ही अत्यंत मानाची समजली जाणारी मानद पदवी बहाल केली आहे.
हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment