नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक पेठवडज शाखेतील प्रिंटर व कम्प्युटर चालू करण्याची मागणी- जाधव व्यंकटी


लोकनेता न्युज नेटवर्क

पेठवडज (प्रतिनिधी) :- नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पेठवठज ता.कंधार जि.नांदेड येथील प्रिंटर अंदाजे चार महिन्यापासून बंद आहे अनेक ग्राहकांना आपल्या पासबुक आतील पैसे किती आहेत हे पाहण्यासाठी व पैसे काढण्यासाठी अनेक वेळा चकरा मारत आहेत कारण अनेक दिवसापासून येथील प्रिंटर बंद असल्यामुळे ग्राहकांना आपल्या पासबुक आत किती पैसे आहेत हे समजत नाही यामुळे अनेक वेळा विनंती पत्र देऊही ती दुरुस्त करत नाहीत यासाठी लोक आंदोलन न्यासचे नांदेड जिल्हा सहसचिव व्यंकटी जाधव. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कंधारे. शरद गायकवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब नांदेड जिल्हा मुख्य कार्यालय नांदेड यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कळवण्यात आले आहे की पेटवडज शाखेतील कॅम्पुटर. व प्रिंटर दुरुस्ती करून येणाऱ्या ग्राहकास व पासबुक नाही अशा ग्राहकांना नवीन पासबुक देऊन सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments