पेठवडज परिसरात गेल्या आठ दिवसांपासून एअरटेल नेटवर्क वारंवार खंडित होत असल्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांत प्रचंड नाराजी


लोकनेता न्युज नेटवर्क

पेठवडज (प्रदीप मुगावे) :- कोणतेही वेबसाईट उघडत नाही, कॉल वारंवार कट होतात, तसेच इंटरनेट सेवा बंद होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे तसेच व्यावसायिकांचे कामकाज ठप्प झाले आहे.

या सततच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन काम करणारे विद्यार्थी, दुकानदार, तसेच कार्यालयीन कर्मचारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मोबाईल शॉपीधारकांनी सांगितले की, ग्राहकांकडून नेटवर्कबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत, मात्र एअरटेल कंपनीचे अधिकारी याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीत.

ग्राहकांनी एअरटेल कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अनेक ग्राहक आता इतर नेटवर्ककडे वळण्याचा विचार करत आहेत. “नेटवर्क नाही, पण रिचार्ज करा” असे सतत येणारे संदेश पाहून लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

रिचार्ज करूनही दोन ते तीन दिवस नेटवर्क पूर्णपणे बंद राहिल्याने 28 दिवसांच्या प्लॅनमधील चार-पाच दिवस वाया जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांकडून एअरटेल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून नेटवर्क सुरळीत करावे, अशी मागणी होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments