लोकनेता न्युज नेटवर्क
किनगाव जट्टू (प्रतिनिधी) :- विद्यार्थ्यांना वही पेनसह खाऊचे वाटप केले.... किनगाव जट्टू येथे फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने 3 जानेवारी 2026 रोजी जि.प. मुलींची शाळेत साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष नारायण राऊत हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये मुलांची शाळा समिती अध्यक्ष विकास मुंडे शाळा समिती.उपाध्यक्ष सचिन मुळे मुख्याध्यापक काकड सर पवार सर ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते लक्ष्मण वाघमारे नागेश सोनुने फुले शाहू.आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष राजेश नागरे गावातील पालक लक्ष्मण वाघमारे नागेश सोनुनेसह नागरिक उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment