कसाय्याच्या तावडीतील ३ कारवडींना मिळाले जीवदान !. कंधार पोलिसांची धाडसी कार्यवाही २.७२ लक्ष रुपयाचा ऐवज जप्त !..


लोकनेता न्यूज नेटवर्क

पेठवडज (प्रदिप मुगावे) :- तालुक्यातील शेल्हाळी पाटी येथे पोलिसांनी कसाबच्या तावडीत जाणाऱ्या ३ गोवंश जातीच्या कारवडींना जीवदान देत २ लक्ष ७२ हजाराचा ऐवज जप्त करून आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले आहे. त्यामुळे कंधार पोलीस ठाणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त असे दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोज शुक्रवारी मध्यरात्री ००:४५ वाजताचे सुमारास आरोपी गजानन मानिका सातगिर रा. खैरका ता. मुखेड, लक्ष्मण कबीर रा. शिकारा ता. मुखेड हे शेल्हाळी पाटी येथे संगणमत करून, गोवंश जातीचे ३ जनावरे टेम्पो क्रमांक एम एच १६- एइ २५२८ मध्ये त्याचे दोरीने घट्ट बांधून त्याची कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करून सदरचे वाहन पकडले.

सदरच्या वाहनाची सखोल चौकशी केली असता, ३ कारवड किंमत ९ हजार रुपये

टेम्पो वाहनाची किंमत २ लक्ष ६३ अशी एकूण २ लक्ष ७२ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती कंधार पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब सानप यांचे फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात कलम ११ (१), ५ (अ),

५(ब),४७,४८,५०,५३,१५८,१७७,३(१),१८१ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोहेकॉ. गीते हे करत आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments