भूमी फाउंडेशनचे कार्य मातृत्व सेवेचे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड


लोकनेता न्युज नेटवर्क

वाघोली प्रतिनिधि ( संतोष कदम) :- पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तत्परतेने कार्यरत असलेले व नुकतेच वाघोली पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.नंदकुमार गायकवाड यांनी भूमी फाउंडेशन संचालित सावित्रीबाई कृषक कन्या निवासी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पातील शिस्तबद्ध व्यवस्था, सुयोग्य नियोजन,निवासी शेतकरी कॅडेट संगोपन तसेच त्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.भूमी फाउंडेशनने मातृत्वाच्या भावनेतून उभारलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी निवासी कॅडेट यांना मार्गदर्शन करताना नंदकुमार गायकवाड म्हणाले, “परिस्थितीला कधीही दुर्दैव समजू नका; तिच्यावर मात करून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवा.संघर्षाला संधी समजून जिंकण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा.जिद्द,परिश्रम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते.”या प्रसंगी संस्थेच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचा आदरयुक्त शाल,श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यांच्या या भेटीमुळे निवासी कृषक कन्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,अशा मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास पवार यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्राध्यापिका जयश्री वाळके यांनी संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.यावेळी मेजर बाळासाहेब हराळ,मेजर संभाजी बेंद्रे,एडवोकेट राऊ पाटील,एडवोकेट डोंगरे पाटील,धनराज वाळके पाटील, अध्यापिका अनिता पवार व प्रकल्पातील कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments