आ.श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते साई कॉम्प्युटरच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत परिक्षा पॅडचे वाटप


लोकनेता न्यूज नेटवर्क

अर्धापूर (आनंदराव मोरे) :- अर्धापूर -शहरातील व तालुक्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना साई कॉम्प्युटर, अर्धापूरच्या वतिने मोफत परिक्षा पॅडचे वाटप करण्यात आले आहे. मोफत परिक्षा पॅड वाटपाचा शुभारंभ भोकर विधानसभेच्या आमदार अँड श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक व्यंकटराव राऊत, राजु कल्याणकर, साई कॉम्प्युटरचे संचालक नागेश खरसकर उपस्थित होते. अर्धापूर तालुक्यात व शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या परीक्षा पॅड (पुरा झरव) चे मोफत वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम साई कॉम्प्युटर, अर्धापूर यांच्या वतीने राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनसामग्रीच्या माध्यमातून : प्रोत्साहन देणे हा आहे. सदर उपक्रम ' साई कॉम्प्युटर अर्धापूरचे संचालक नागेश खरसकर यांच्या संकल्पनेतून

साकारत असून, हा कार्यक्रम आमदार अँड श्रीजया चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडावा अशी आयोजकांची मनापासून इच्छा होती. या कार्यक्रमांतर्गत काही निवडक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आमदार अँड श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते परीक्षा पॅड वितरित करण्यात आले असून, मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा

कार्यरत असलेल्या साई कॉम्प्युटर अर्धापूरकडून यापूर्वीही विविध उपक्रम राबविण्यात आले असून, सदर उपक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस नवी दिशा मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. हा उपक्रम समाजोपयोगी व विद्यार्थ्यांच्या सर्व स्तरातून त्याचे स्वागत होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments