उर्जा संवर्धन संशोधन प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड! कु.आराध्या जायभाये करणार प्रकल्पाचे सादरीकरण


लोकनेता न्यूज नेटवर्क

नांदेड (पंकज गादेकर) :- नांदेड येथील शाकुंतल विद्यालयातील इयत्ता सहावी (सीबीएसई) वर्गात शिकत असलेली कु.आराध्या सुधाकर जायभाये हिने नांदेड येथे संपन्न झालेल्या विभागीय डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार केले असून तिची मुंबई येथे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रकल्प सादरीकरणासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत कु.आराध्या ही “उर्जा लेखापरीक्षण आणि संवर्धन” (एनर्जी ऑडिट अँड कन्झर्वेशन) विषयावर आपला संशोधन प्रकल्प सादर करणार आहे. शाश्वत उर्जा संवर्धन ही काळाची गरज असून उर्जा बचत म्हणजे खऱ्या अर्थाने देशाच्या शक्तीची बचत आहे. या अनुषंगाने तिने नांदेड येथील उर्जा संदर्भात विविध शासकीय आणि खाजगी कार्यालयांना भेटी देऊन उर्जेचे महत्व जाणून घेतले असून आपल्या प्रकल्पात ती उर्जा बचत आणि उर्जा वापर बाबतीत विविध आधुनिक उपकरणांचा वापर जसे एलीडी वापर, सोलर उर्जा, पवनचक्की, जलउर्जा इत्यादी उर्जेच्या संदर्भाने आपले संशोधन सादर करणार आहे. तसेच उर्जा बचतीच्या अनुषंगाने विविध पोस्टर्स, गावात आणि शहरात जाऊन उर्जा संवर्धन संदर्भात जागृती करण्याचे ती सांगणार आहे. या प्रकल्पासाठी तिने स्वतः विविध पोस्टर्स तयार केले असून या यशाबद्दल कु.आराध्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रकल्पासाठी तिला शाकुंतल विद्यालयाचे प्राचार्य श्री सदाशीव टाकळे, उपप्राचार्या भावना बार्शीकर, नांदेड एमएसईबीच्या अभियंता किरण देशमुख, एमजीएम, नांदेडचे प्रा.डॉ.गंगाधर बरसे, श्री पांडुरंग इलेक्ट्रिकल यांनी मार्गदर्शन केले असून सर्वांनी पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments