जाधव व्यंकटी गोविंद यांना २०२५ वर्षाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर


लोकनेता न्यूज नेटवर्क

कंधार (वसंत गादेकर) :- पेठवडज परिसरात ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी जपत लोकहितासाठी अखंड झटणारे काम करताना त्यांनी तालुक्यातील होणाऱ्या अवैध धंदे दारू मटका यात्रे त चालणारी पोट याचे विरोधात व्यसनमुक्ती साठी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

गोरगरीब कुटुंबे, विधवा महिला तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारांना नाम फाउंडेशनची वेळोवेळी आर्थिक मदत व अन्नधान्य देऊन 

आधार दिला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी भेसळ बियाणे अवैध विक्री करणाऱ्या खतावर नियंत्रणासाठी पाठपुरावा करून योग्य दरात बियाणे व खते मिळवून देण्यास हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला. हेमोफिलिया आजारावर जिल्ह्यामध्ये उपचार नव्हता तो शासनाकडे वेळोवेळी मागणी करून हेमोफिलीया या आजारावर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नांदेड येथे उपलब्ध करून दिले 

कोरोना काळात साडी-चोळी व अन्नधान्य मांस वाटप करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला.

 तसेच गरजूंना स्वतः दवाखान्यात नेऊन उपचाराची सोय करून दिली . जिल्ह्यात मास सॅनिटायझर अशा वस्तू एमआरपी पेक्षा जास्त किमतीने विकत असलेल्या मेडिकलधारकावार दंड आकारण्यात आला 

 कंधार तालुक्यातील तंटामुक्ती आलेले बक्षीस मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करून तंटामुक्ती भवन शासनाचा निधी मिळवला.

तसेच तालुक्यातील रस्ते, व एस.टी. बससेवेसाठी सातत्याने प्रयत्न केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रखडलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा करून ती ठेवी परत मिळवल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी जिल्ह्यातील सर्व बँकांना कॅमेरे बसवण्यात शासना भाग पाडले गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले.

2010 मध्ये स्वतःचे देहदान केले संकल्पही केला असून आजपर्यंत 19 वेळा रक्तदान केले आहे.

 गरजूंना रक्त मिळावे यासाठी चार वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले.

 त्याच पद्धतीने जनतेनी ईव्हीएम वर गैर विश्वास दाखवल्या कारणाने जनतेच्या मताप्रमाणे लोकशाहीमध्ये जनतेच्या मताचा विचार करून ईव्हीएम हटवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सातत्याने दोन वर्षापासून राष्ट्रीय संविधान बचाव अभियान नांदेड जिल्हा महासचिव च्या माध्यमातून आंदोलने करीत आहोत.

 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतकऱ्यांना वीज वेळेवर द्या अशा अनेक शेतकऱ्यांच्या समस्यासाठी लढा दिलेला आहे.

समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यंकटी गोविंद जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन 

 दैनिक चालू वार्ता यांनी त्यांना 2025 चा समाज रत्न पुरस्कार जाहीर केला आहे .

सदरील पुरस्काराचे वितरण 19 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे येथे होणार आहे

त्यांना मिळणारा हा पुरस्कार पेठवडज ग्रामीण भागासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या पुढील पत्रकार व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments