सेवा, समर्पण आणि संवेदनशीलतेचा आदर्श – पांडुरंग व्यंकटराव पाटील कंधारे


लोकनेता न्यूज नेटवर्क

कंधार (अविनाश कदम) :- समाजसेवा हीच खरी पूजा मानून गोरगरीब, विधवा महिला तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी सातत्याने कार्य करणारे पांडुरंग व्यंकटराव पाटील कंधारे यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. आर्थिक मदत, अन्नधान्य वाटप आणि गरजूंना प्रत्यक्ष मदत करून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. विधवा महिलांना 30 किलो चना देऊन वर्षभराच्या डाळीचा प्रश्न सोडविण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविला. कोरोना काळात साडी-चोळी व अन्नधान्य वाटप करून अनेक कुटुंबांना आधार दिला, तसेच गरजूंना स्वतः दवाखान्यात नेऊन उपचाराची सोय करून मानवतेचे जिवंत उदाहरण घालून दिले.

पेठवडज येथे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी शासनाच्या तंटामुक्ती भवन उभारणीसाठी पुढाकार घेतला. गावातील रस्ते, पाणीपुरवठा योजना तसेच एस.टी. बससेवेसाठी सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना चालना दिली. मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून गोरगरीब जनतेला बँकेमार्फत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्यांची ग्रामरक्षक दल सदस्य म्हणून निवड झाली होती, ज्यातून त्यांच्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती येते.

2011 मध्ये स्वतः नेत्रदानाचा संकल्प करून शासनाकडे फॉर्म भरला असून आजपर्यंत त्यांनी 22 वेळा रक्तदान केले आहे. गरजूंना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी पेठवडज येथे चार वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. तसेच 1989 च्या बॅचचा प्रथम शालेय संवगडी मेळावा आयोजित करून सामाजिक एकात्मतेचा सुंदर आदर्श घालून दिला.

त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत नांदेड जिल्हा मित्रमंडळ सामाजिक संस्था, संभाजीनगर यांच्या वतीने त्यांना “समाजभूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच “समाज रत्न पुरस्कार 2025” जाहीर होणे हा त्यांच्या कार्याचा आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.

समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या पांडुरंग व्यंकटराव पाटील कंधारे यांना मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा - गोविंदराव केंद्रे पेठवडज.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments