जागतिक रेडिओ दिनानिमित्त रेडिओ बद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा



लोकनेता न्युज नेटवर्क

हवेली (संतोष कदम) :- मागील दोन शतकांत मानवाने अनेक वैज्ञानिक, शास्त्रीय , तांत्रिक -यांत्रिक शोध लावून आपले दैनंदिन जीवन सहज व सोपे केले आहे. रेडिओ ची निर्मिती देखील त्याचाच एक अविभाज्य भाग आहे.तणावपूर्ण परीस्थितीत मनोरंजना बरोबरच एक मित्र म्हणून रेडिओ महत्वाची भुमिका बजावतो.१३ फेब्रुवारी हा दिवस " जागतिक रेडिओ दिवस " म्हणून सर्व जगभरात साजरा केला जातो, याच दिवसाचे औचित्य साधून येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अंतर्गत 

' रेडिओ एफ् टी आय आय - ९०.४ एफ् एम् या लोकप्रिय वाहिनीवर " नाते रेडिओशी..! "

या आगळ्यावेगळ्या गप्पा -गोष्टी, संवाद आणि काव्य मैफिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय रेडिओ चे आगमन झाल्यानंतर ते केवळ मनोरंजनाचे साधन न राहता लोकजागृती व लोक शिक्षणातून प्रगती साधणारी जीवन मुल्ये समाज मनावर रुजविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरले आहे.बालोद्यान सारख्या कार्यक्रमातून किशोर वयीन मुलांप्रमाणेच युवक, कामगार वर्ग, शेतकरी, सैनिक व जेष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांचे ज्ञान,मनोरंजन करीत आहे.अशा या प्रभावी श्राव्य माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील साहित्यिकांनी कवितां बरोबरच अतिशय हृद्य आठवणींना उजाळा देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

रेडिओ हे एकेकाळी सर्वात प्रभावी मनोरंजनाचे साधन आणि अनमोल माहितीचा साठा होता. 

    कालच्या गप्पांना सूत्र होतं पण काचणारं बंधन नव्हतं. दिलीप लिमये,दाक्षायणी पंडित,चंचल काळे आणि शमा राठोड , रेडिओ मित्र आर जे संजय हिरवे यांनी देखील रेडिओच्या आठवणींना उजाळा दिला.

स्वर्गीय अमिन सयानी यांचा हुबेहूब आवाज काढणारे रेडिओ मित्र आर जे संजय हिरवे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली .

रेडिओ एफटीआयआय स्टेशन चे प्रभारी श्री विश्वास नेर्लेकर सर आणि स्टेशन मॅनेजर अनुराधा वजीरे मॅडम यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला.

कार्यक्रमात शेवटी संपूर्ण रेडिओ एफ् टी आय टिमचे, सहभागी मान्यवरांनी निवेदिका नीता तुपारे मॅडम यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. लवकरच सदर कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येणार आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments