“दे. लोकनेता – निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा”


लोकनेता न्युज नेटवर्क

प्रतिक्रिया

आजच्या काळात माध्यमांची भूमिका केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर समाजमन घडविण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरली आहे. मात्र दुर्दैवाने, काही माध्यमे पक्षपाती भूमिका घेताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी सत्य दडपले जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दे. लोकनेता हे दैनिक “नव्या विचारांचे नवे दैनिक” या भूमिकेसह पुढे येत आहे, ही अत्यंत सकारात्मक आणि स्वागतार्ह बाब आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांनी सत्तेला प्रश्न विचारणे, चुकीच्या धोरणांवर बोट ठेवणे आणि जनतेच्या हितासाठी ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. दे. लोकनेता या दृष्टीने निर्भीड, स्पष्ट आणि ठाम पत्रकारितेची वाट चालत असल्याचे दिसून येते. कोणत्याही दबावाला न जुमानता सत्य मांडण्याचे धैर्य हेच खऱ्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे आणि ते या माध्यमातून प्रकर्षाने जाणवते.

आजच्या माहितीच्या प्रचंड गर्दीत दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि अपूर्ण माहितीचा प्रभाव वाढत असताना, वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण लेखनाची गरज अधिक अधोरेखित झाली आहे. लोकनेता हे दैनिक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर सखोल विश्लेषण करत समाजासमोर वस्तुस्थिती मांडण्याचे कार्य करत आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

समाजहिताला प्राधान्य देत, कोणत्याही प्रकारच्या दबाव किंवा प्रभावाला बळी न पडता, निष्पक्ष आणि धैर्याने पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे. लोकनेता या दिशेने सक्षम पावले टाकत असून, भविष्यातही हे दैनिक जनतेचा विश्वास अधिक बळकट करेल, असा विश्वास आहे.

याचबरोबर, गेल्या अनेक वर्षांपासून एका वर्षात माझ्या पुढाकारातून एकूण ९० हून अधिक सामाजिक, धार्मिक व जनजागृतीपर उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येतात . विशेष म्हणजे, त्यापैकी ३ उपक्रम हे वर्षातील ३६५ दिवस सातत्याने सुरू राहणारे असून, समाजहितासाठी अखंडपणे कार्यरत आहेत. हे केवळ उपक्रम नसून समाजपरिवर्तनाचा सातत्यपूर्ण आणि ठोस प्रयत्न आहे.

आज अनेक जण केवळ बोलण्यापुरते मर्यादित राहतात; मात्र आम्ही प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे आणि पुढेही तेच करत राहणार आहोत. समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचून जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रामाणिकपणे आणि सातत्याने सुरू आहे.

आपण अशा ठोस, सातत्यपूर्ण आणि समाजाभिमुख कामांची योग्य दखल घेऊन त्यांना न्याय्य आणि व्यापक प्रसिद्धी द्यावी, ही अपेक्षा नसून काळाची गरज आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या उपक्रमांना व्यापक व्यासपीठ मिळणे अत्यावश्यक असून, माध्यमांनी यात सकारात्मक आणि जबाबदार भूमिका बजावावी.


मी दैनिक लोकनेता परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी सत्य, धैर्य आणि समाजहित या मूल्यांवर ठाम राहून निर्भीड पत्रकारितेची परंपरा अधिक भक्कम करावी, ही अपेक्षा व्यक्त करतो.


– धर्मभूषणॲड. दिलीप ठाकूर

(भाजपा जिल्हा सरचिटणीस नांदेड )

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments